बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (10:01 IST)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांचे निधन

mohan yadav
मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वडील पूनमचंद यादव यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांचे वय 100 वर्षे होते असे सांगण्यात आले आहे. तसेच पूनमचंद यादव हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. व त्यांच्यावर उपचार सुरु होते. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच मोहन यादव यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. व भोपळवरून उज्जेनला पोहोचलेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. 
 
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, परमपूज्य बाबा श्री पूनमचंद यादव जी यांचे निधन हे माझ्या आयुष्यातील कधीही भरून न येणारे नुकसान आहे. तसेच वडिलांचे संघर्षमय आणि नैतिक मूल्ये आणि तत्त्वांनी परिपूर्ण जीवन नेहमीच सन्मानजनक मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देत आले आहे. तुम्ही दिलेली मूल्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील. मी माझ्या वडिलांना त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो.
 
मुख्यमंत्री मोहन यादव यांचे वडील स्व. पूनमचंद यादव हे हीरा कंपनीमध्ये नौकरी करायचे. व त्यांनी आपल्या जीवनात अनेक संघर्षांना तोंड दिले आहे.