शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (11:41 IST)

विजयवाड्याच्या इंद्रकिलाद्री डोंगरावरील स्वयंभू आई कनक दुर्गा देऊळ

इंद्रकिलाद्री डोंगरावरील बनलेल्या आणि कृष्णानदीच्या काठी वसलेले आई कनक दुर्गा देवीचे देऊळ फार प्राचीन आहे. असे मानतात की या देऊळात स्थापित असलेली देवी आई कनक दुर्गाची मूर्ती 'स्वयंभू' आहेत. या देऊळाशी निगडित एक पौराणिक गोष्ट आहे की एकदा राक्षसांनी आपल्या शक्तीचा वापर पृथ्वीच्या नासधूस करण्यासाठी केला असे.
 
त्यावेळी राक्षसांचा संहार करण्यासाठी आई पार्वतीने वेग-वेगळे रूप घेतले. त्यांनी शुंभ- निशुंभला मारण्यासाठी कौशिकी, महिषासुराला मारण्यासाठी महिषासुरमर्दिनी आणि दुर्गमसुराचा संहार करण्यासाठी दुर्गा सारखे रूप घेतले. 
 
कनक दुर्गेने एका भक्त 'किलाणू' याला डोंगराचे रूप धरण्यास सांगितले. ज्यावर त्या वास्तव्य करतील. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या देऊळात भाविकांच्या गर्जनेने संपूर्ण वातावरण आध्यात्मिक होतं. या देऊळात जाण्यासाठी पायऱ्या आणि रस्ते देखील आहेत पण बहुतेक भाविक लोकं देऊळात जाण्यासाठी सर्वात कठीण मार्ग म्हणजे पायऱ्यांचा वापर करतात. तसेच दुसरी कडे काही भाविक हळदीने पायऱ्यांना सजवीत चढण करतात, ज्याला 'मेतला पूजन' (पायऱ्यांची पूजा) असे ही म्हणतात.
 
विजयवाड्यातील इंद्रकिलाद्री नावाच्या या डोंगरावर वास्तव्यास असलेली आई कनक दुर्गेश्वरीचे देऊळ आंध्रप्रदेशातील मुख्य देऊळांपैकी एक आहे. ही अशी जागा आहे, जिथे एकदा तरी येऊन त्याचा बद्दल विसरणे जीवनात कधीही शक्य नाही. देवी आईचा आशीर्वाद मिळविण्यासाठी वर्षभर या देऊळात भाविकांची वर्दळ असते. पण नवरात्रात तर याची महत्ता लक्षणीय असते. 
भाविक येथे विशेष प्रकाराची पूजा आयोजित करतात. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी भगवान शिव यांचा कठोर तपश्चर्येमुळे अर्जुनाला पशुपतास्त्राची प्राप्ती झाली असे. या देऊळाला अर्जुनांनी आई दुर्गाच्या सन्मानार्थ बनवले होते. 
 
असे ही मानलं जातं की आदिदेव शंकराचार्य देखील इथे आले होते आणि आपले श्रीचक्र स्थापित करून देवी आईची वैदिक पद्धतीने पूजा केली होती. नंतर किलाद्रीची स्थापना आई दुर्गाच्या वास्तव्यास म्हणून झाली. महिषासुराचा वध करताना इंद्रकिलाद्री डोंगरावर देवी आई अष्टभुजारूपात हातात शस्त्र घेऊन सिंहवासिनी स्थापित झाली. जवळच्या खडकावर ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव देखील स्थापित झाले. ब्रह्माने इथे शिवाची मलेलू (बेल) च्या फुलांनी पूजा केली होती, म्हणून इथे एका शिवाचे नाव मल्लेश्वर स्वामी असे झाले.
 
इथे येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, या मुळे इथे सुमारे चारशे लशलक्षांहून अधिक वार्षिक अंशदान अर्पण केला जातो. सात शिवलीला आणि शक्ती वैभव असलेल्या काही देऊळापैकी हे एक आहे. 
 
इथे देवी आई कनकदुर्गेला विशेष करून बालत्रिपुरा, सुंदरी, गायत्री, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनी आणि राजराजेश्वरीदेवीच्या रूपात नवरात्रात सजवतात. विजयादशमीच्या निमित्त देवींना हंसाकाराच्या होडीत बसवून कृष्णानदीला फिरवून आणतात. जे ‘थेप्पोत्सवम' च्या नावाने प्रख्यात आहे. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र सांगताच्या आणि दसऱ्याच्या निमित्तानं या दिवशी आयुध पूजा केली जाते.    
कसं जावं ?
असे म्हणतात की इथे इंद्रदेव सुद्धा भटकंतीसाठी येतात, म्हणून या डोंगराचे नाव इंद्रकिलाद्री झाले. इथली एक प्रमुख गोष्ट म्हणजे अशी की साधारणपणे देवाच्या डाव्या बाजूस देवींना स्थापित करण्याच्या प्रथेला मोडत येथे मलेश्वराच्या उजव्या दिशेने देवी आई वसलेली आहे. या मुळे या डोंगरावर शक्तीचे महत्व दिसून येतं.

विजयवाड्याच्या मध्यभागी असलेले हे देऊळ रेल्वे स्थानकापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. विजयवाडा हैदराबाद पासून 275 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान रेल्वे, रस्ते, आणि हवाई मार्गाने देशांच्या सर्व भागाशी जोडलेले आहे.