महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे

Maharashtra shaktipeeth
Last Modified सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (12:38 IST)
देवींच्या साडे तीन शक्ती पीठांमधून आद्यपीठ कोणते आहे, साडे तीन शक्ती पीठाची माहिती घेऊया. यंदाच्या वर्षी कोरोनासाथीच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. देऊळात पण वर्दळ नसणार, सगळे काही काटेकोर पद्धतीने सामाजिक अंतर

राखून, सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना पाळून नवरात्रोत्सव चा सण साजरा होणार आहे. खरं तर नवरात्र म्हटलं की सर्वांची पावले देवी आईच्या देऊळा कडे आपसूकच वळतात. सगळीकडे एक तेजोमय, पावित्र्य वातावरण होऊन जातं.
आपल्या देशात महाराष्ट्र राज्यात देवींचे साडे तीन शक्तिपीठं आहेत. दर वर्षी इथे नवरात्रात फार गर्दी उसळते, पण यंदा कोरोनाने मांडलेला उच्छादामुळे सर्व सण एका चोकटीत राहूनच साजरे करावे लागणार आहेत. आपणास माहितच असेल की हे साडे तीन शक्तिपीठे कोणते आहेत.

कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि नाशिकची सप्तश्रृंगी देवी. हे सर्व शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहेत. कारण हे सगळे स्थळ जागृत आहेत. यांच्याशी निगडित बऱ्याच आख्यायिका आहेत. इथे भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्ती पीठांना भेट देतात. इथे नवरात्रात खूप गर्दी असते. आज आपण या शक्तिपीठांबद्दल जाणून घेऊया.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर -
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच आपली अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहेत. कोल्हापूरची अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या वेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली. त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित केले गेले आहे. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहेत. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे.

तुळजाभवानी -
तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो.

रेणुका देवी माहूर गड -
माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साढे तीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला. माता रेणुकाची एक कथा आहे- या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर' म्हटले जाऊ लागले. आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.

सप्तशृंगी देवी नासिक -
या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वर 4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर वास्तव्यास आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी देवांनी त्याची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. या महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या ...

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद का?
हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानने ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

Shri Ram Chalisa : राम चालीसा पाठ करा, प्रभूचा आशीर्वाद ...

Shri Ram Chalisa : राम चालीसा पाठ करा, प्रभूचा आशीर्वाद ‍मिळवा
श्री रघुवीर भक्त हितकारी। सुन लीजै प्रभु अरज हमारी॥ निशिदिन ध्यान धरै जो कोई। ता सम भक्त ...

॥ श्री रामाची आरती ॥

॥ श्री रामाची आरती ॥
त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ...

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...