1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मनसेचे ४ आमदार चार वर्षांसाठी निलंबित

अबू आझमी यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी मनसेच्या चार आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या या प्रस्तावाला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली.

अबू आझमी यांनी हिंदीत शपथ घेतल्यानंतर राम कदम, रमेश वांजळे, यांनी त्यांना विरोध करत त्यांना शपथ घेण्यापासून रोखले होते. यानंतर राम कदम यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आझमी यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मनसेच्या आमदारांविरोधात कारवाईची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष गणपतराव देशमुख यांच्या समोर पाटील यांनी मनसेच्या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला असता त्यांनी आवाजी मतदान घेतले. यात या चार आमदारांना निलंबित करण्याच्या बाजूने मतं पडल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

निलंबिकरण्याआलेल्यआमदारांमध्यराकदम, वसंगिते, रमेवांजळे, शिशिशिंदयांचसमावेआहे.