पुण्यात पोस्ट ऑफिसच्या बाहेरच पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात गेला
पुण्यातील समाधान चौकात सिटी पोस्ट ऑफिस परिसरात रस्त्यावर मोठा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात पुणे महापालिकेचा टेम्पो कोसळला.सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी अग्निशमन विभागाचे 20 कर्मचारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिससमोरील रस्त्याचा काही भाग खचला आणि त्यात एक टेम्पो पलटी झाला.
या भागात सांडपाणी वाहिन्यांबाबत तक्रारी मिळाल्या होत्या . महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरु असताना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाले सफाईच्या कामासाठी पुणे महापालिकेचा टेम्पो पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्यानंतर ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा टेम्पो पोस्ट ऑफिसच्या इमारतीजवळ उभा होता. त्यानंतर अचानक कॅम्पसमधील रस्त्याचा काही भाग कोसळला. काही वेळातच टेम्पो भूमिगत झाला. हा प्रकार पाहताच तेथे गोंधळ उडाला.चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतून उडी घेतली आणि जीव वाचवला. टेम्पो ट्रक खड्ड्ड्यात गेल्याने त्यात पाणी साचू लागले. अग्निशमन दलाचे जवान या स्थळी पोहोचले आणि ट्रक ला काढण्याचे प्रयत्न सुरु केले.
Edited By - Priya Dixit