शिक्षकांची ५० टक्केच रिक्त पदे भरती शक्य

Last Modified गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:20 IST)
शासनाने आधी घातलेले निर्बंध हटवून शिक्षकांची ५० टक्केच रिक्त पदे भरता येतील असे आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र ही भरती करताना काही अटी घातल्या आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भरतीवरील निर्बंध उठविण्यात येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अनुदानित/अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र शाळा व अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक व अन्य संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के इतक्या मर्यादेत पदे भरण्यास पूर्वी एक आदेश काढून मुभा दिली होती. ११ जानेवारी २०१६ रोजी एक आदेश काढून ७५ टक्क्यांऐवजी ५० टक्क्यांपर्यंत पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, बुधवारी काढलेल्या आदेशात १५ जून २०१६ रोजी घातलेले ५० टक्के निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यासाठी शासनाने घातलेल्या अटी अशा - संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतरही शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येएवढी शिक्षकांच्या संख्येएवढी त्याच गटातील शिक्षकांची पदे रिक्त ठेवण्यात यावीत. उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुकडीनिहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदे भरण्यात यावीत, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष

जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष
7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हे संयुक्त राष्ट्र ...

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल
देशात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात जास्त रुग्णांची संख्या ...

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉकडाऊनमुळे महसूल तोटा झाला ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...