शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 मार्च 2024 (12:12 IST)

शिवरात्री उपवासाला भगर खाणार; अलर्ट

सावधान उपवासासाठी तुमचाही भगर खाण्याचा विचार असेल. विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना भगर खाल्याने समोर आलीय. अनेक लोक उपवासाची भगर उपवास असेल तर खातात. आज महाशिवरात्री आहे तर अनेक लोक उपास करतात जर तुमचा ही विचार उपसाची भगर खाण्याचा असेल तर सावधगिरी बाळगा. कारण भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव आणि मुदखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसात दहा ते बारा गावातील नागरिकांना  तसेच  साठ ते सत्तर लोकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आज महाशिवरात्री आहे तर अनेक लोक उपवास करतात आणि भगर खातात. तुम्ही देखील उपसाला भगर खात असाल तर सावधानी बाळगा.  
 
एकादशी आणि महाशिवरात्री असल्यामुळे  मोठया संख्येने लोक उपवास करतात. तसेच काल एकादशी निमित्त काही नागरिकांनी भगर सेवन केली पण त्यातून त्या नागरिकांना विषबाधा झाली. काहींना रात्री तर काहींना पाहटे उलट्या, मळमळचा त्रास झाला. मोठया संख्येने नागरिक विष बाधित झाले. तसेच विषबाधा झालेल्या नागरिकांना हदगावमधील उपजिल्हा रुग्णालय भर्ती केले तर काहींना खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik