शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:15 IST)

यापुढे हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, मात्र........

महाराष्ट्रातील हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील बार आणि रेस्तराँ यांच्याबाबतीत राज्य सरकारने सदरचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता हॉटेल्सबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता हॉटेल्सही सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून तेथील यंत्रणांना या निर्णयात बदल करता येईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. 
 
मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यापासून राज्यातील सर्व हॉटेल्स बंद आहेत. अनलॉकमध्ये हॉटेल रेस्तराँ यांना हॉटेल उघडे ठेवून पार्सल देण्याची संमती देण्यात आली होती. इतर अस्थापनांप्रमाणे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ हीच वेळ हॉटेल्ससाठी देण्यात आली होती तर मागील महिन्यापासून ही वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. मात्र त्यामुळे हॉटेल चालक आणि ग्राहक यांचा काहीही फायदा होत नव्हता. आता सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हॉटेल्स सुरु ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. हॉटेल चालकांना करोना उपाय योजनांचे सर्व नियम पालन करावे लागेल असेही नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.