तुकाराम मुंढे नकोसे झाले म्हणून यांचा काटा काढण्याचा प्रयत्न

tukaram mundhe
Last Modified मंगळवार, 23 जून 2020 (23:11 IST)
नागपुरात एकीकडे करोनाचं संकट असताना दुसरकीडे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe)आणि नगरसेवक हा वाद चिघळला आहे. महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढेंविरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.

स्मार्ट सिटीमध्ये २० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली असून तुकाराम मुंढे नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय असा आरोप केला आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? तुकाराम मुंढेंवर (Tukaram Mundhe) वर आरोप? लाज वाटली पाहिजे या महापौरांना. अतिशय सरळमार्गी आणि तत्ववादी आहेत ते. तुम्हाला ते नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय”.
तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी महापौर स्वत: पोलीस स्थानकात हजर होते. स्मार्ट सिटी संदर्भात सहा महिन्यात घेतलेल्या कुठल्याही निर्णयाची माहिती न देण्यावरून महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधला होता.
आतापर्यंतचे निर्णय व कामाची कागदपत्रे २४ तासात सादर करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले होते. स्मार्ट सिटीतील सहा कर्मचाऱ्यांना संचालकांना विश्वासात न घेता आयुक्तांनी सेवामुक्त केले होते. महापौरांनी आयुक्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा अर्ध्यावर सोडून निघून गेल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईतील जे जे रूग्णालयात कोरोना ...

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण

किंचित दिलासा, राज्यात 58,924 नवे कोरोना रुग्ण
राज्यात सोमवारी तब्बल 58 हजार 924 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 351 ...

अहमदनगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य ...

अहमदनगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य उपलब्धता
भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील व परीवाराने नगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर ...

सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी मार्गदर्शक प्रणाली जारी

सूक्ष्म कंटेनमेंट झोनसाठी मार्गदर्शक प्रणाली जारी
साथरोग कायदा १८९७, कलम दोन अनुसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती ...

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, ...

धक्कादायक ! अंत्यविधीसाठी शंभरावर लोकांची उपस्थिती, नातेवाईकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायले
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ...