शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)

राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी नोंदणी सुरु

महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एनटीएस स्पर्धेच्या आगामी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ८ ऑक्टोबरपासून परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर २०२० रोजी होणार असून राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ जून २०२१ रोजी होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र परीक्षा परिषेदेने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता १०वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्कासह ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन विषय मिळून २०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलगू अशा सात भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in किंवा http://nts.mscescholarshipexam.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन परिषदेने केले आहे.