सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते- पृथ्वीराज चव्हाण
राहुल गांधींनी विधान केले. तो विषय तिथे संपला. काळ्या पाण्याची शिक्षा हजारोंना झाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा वाईट होती. ती सावरकरांना झाली होती. सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणारा तुलनात्मक घेतले पाहिजे. राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली. पुरावे दाखवले. त्यावरून वाद निर्माण झाला. ऐतिहासिक पुरुषांकडे पाहताना सर्व दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींच्या विधानावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सावरकरांनी भारताच्या १८५७ च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. ते शिपयांचे बंड नव्हते तर स्वातंत्र्ययुद्ध होते असं पुस्तक लिहिलं होतं. तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. पॅरिसमधून त्यांना अटक केली. मग त्यांना भारतात आणताना जहाजातून समुद्रात उडी मारली होती. हे खरे आहे. ते क्रांतिकारक होते, लेखक होते. त्यांच्या सगळ्या मतांवर सहमत होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं.
परंतु वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती. १० वर्षानंतर त्यांची मानसिकता मोडली. तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. आणखी ४० वर्ष जेलमध्ये राहायचं म्हणून त्यांनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी मदत करेन अशी पत्र लिहिली. ते माफीवीर होते असं राहुल गांधींनी म्हटले ते पुरावे दाखवले असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor