नारायण राणेंच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया
काल राज्याचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य दिले होते की, भाजपने 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढावी. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात काल शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढावे असे वक्तव्य केले होते. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असे ते म्हणाले.
त्यांनी दिलेल्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली असून जर भाजपचं 288 जागांवर लढणार तर महायुती कशाला आहे. असे विचारले आहे.
म्हस्के म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असे काहीही मत नाही. प्रत्येक पक्षाला त्यांच्या ताकदीनुसार महायुतीच्या जागा वाटप होतील. जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते घेतील.
Edited By- Priya Dixit