शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

हे आहेत ते किल्ले ज्यावरून वाद सुरु झाला ...

राज्य सरकारने पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे, की किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच येतच नाःई. यामध्ये पहिल्या टप्प्यात ज्या 22 किल्ल्यांचा विकास केला जाणार होता, त्यापैकी काही किल्ल्यांची नावं समोर आली आहेत. 
 
किल्ल्यांची यादी
 
नागरधन – गोंड राजांकडून बांधकाम
कंधार- राष्ट्रकूट राजांकडून बांधकाम
नळदुर्ग- नळ राजांकडून बांधकाम
लळिंग- फारुखी राजांकडून बांधकाम
कोरिगड- निर्माता अज्ञात
साल्हेर- शिवरायांनी जिंकलेला किल्ला
घोडबंदर- पोर्तुगिजांकडून बांधकाम
पारोळा- झाशीच्या राणींच्या वडिलांकडून बांधकाम
सरकरने दिलेल्या स्पष्टीकरणा नुसार राज्यात दोन प्रकारचे किल्ले वर्गवारी असून,  एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.