शरद पवार क्वारंटाईन होणार का?

sharad panwar
Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:06 IST)
कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर 'माझे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करत आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट द्वारे दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शरद पवार यानी ट्विट केले आहे, की "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व
नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत."

शरद पवार क्वारंटाईन होणार का?
दरम्यान, रविवारी नाशिक येथे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ हे
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या सोबत उपस्थित होते. मात्र, छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळीच आपली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट द्वारे दिली होती. त्यामुळे आता शरद पवार व अजित पवार क्वारंटाईन होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसेच रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक देखील पार पडली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र
राज्यात अत्त्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याचे ...

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा
राज्यात सध्या १ हजार २५० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० ...

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर
राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ जणांच्या मृत्यू नोंद ...

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या ...

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू
राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना १५ ...