जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ।।जय।।धृ।।
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा। उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला । रुणझुण करिती घागरिया घोळा । सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ।।जय।।1।।
सारीगमपधनीसप्तस्वरभेदा । धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा । तातक् तातक् थैय्या करिसि आनंदा । ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ।।जय।।2।।
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना । परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना । ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना । मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ।।जय।।3।।
|