मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > आरती संग्रह
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीकृष्णाची आरती

ओंवाळूं आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा।।धृ।।
चरणकमल ज्याचे अति सुकुमार।
ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर ओंवाळूं।।1।।

नाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान।
हृदयीं पदक शोभे श्रीवच्सलांछन। ओंवाळूं।।2।।

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी।
वेधलें मानस हारपली दृष्टी। ओंवाळूं।।3 ।।

जडित मुगुट ज्याचा देदीप्यामान।
तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन। ओंवाळूं।।4।।

एका जनार्दनीं देखियलें रूप।
रूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप। ओंवाळूं।।5 ।।
आणखी
संकटनाशनगणेशस्तोत्र
श्री गणेश आरती
नवनागस्तोत्र
आरती महालक्ष्मीची
श्री शंकर आरती
श्री मंगळागौरीची आरती