मोनिका डोपिंग आरोपातून मुक्त, बिजींग जाणे अशक्य
दैव देते कर्म नेते
नवी दिल्ली- भारोत्तोलन स्पर्धेतील भारतीय खेळाडू मोनिका देवीला मादकद्रव्य सेवनाच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. असे असले तरीही तिचे बिजींग ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणे आता अशक्य आहे. भारतीय ऑलम्पिक महासंघाचे (आयओए) महासचिव रणधीर सिंह यांनी सांगितले, की मोनिका देवीची मादकद्रव्य सेवन केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र तिला आता ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणे शक्य होणार नाही. कारण महासंघाने तिची प्रवेश प्रक्रिया या पूर्वीच रदद केली आहे. भारतीय संघातून तिचे नाव काढून घेण्यात आले होते. महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडीही याबाबत आता काहीही करू शकणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. मोनिकाने याप्रकरणात आधीच आपण निर्दोष असून आपल्याविरुध्द षडयंत्र केले गेल्याचे सांगितले होते. बिजींगमध्ये भारोत्तोलन स्पर्धा 13 आगस्ट पासून सुरू होत आहेत.