शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: इंफाल , मंगळवार, 12 ऑगस्ट 2008 (18:11 IST)

मोनिका प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी

मणिपुरमधील भरोत्तोलक खेळाडू मोनिका देवी डोपिंगमध्ये दोषी आढळून आल्यानंतर आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मणिपुरचे मुख्य सचिव राकेश यांनी केली आहे.

या संदर्भातील सिफारीश केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय मुख्य सचिव सत्येंद्र मिश्र यांना मणीपूर सरकारने या संदर्भात एक पत्रही पाठविले आहे.

मोनिका ऑलिंपिकमध्ये पदकाची दावेदार मानली जात होती. परंतु डोपिंग टेस्टमध्ये ति दोषी आढळून आल्याने तिला ऑलिंपिक संघातून वगळण्यात आले होते.

आपण निर्दोष असताना आपल्याला जाणून- बुजून यात गोवण्यात आल्याचा आरोप मोनिकाने केला आहे.