मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (13:05 IST)

काय सांगता, आधार कार्ड असू शकतं FAKE, कसं ओळखाल जाणून घ्या

how to check fake aadhar card
सध्या कोरोनाच्या काळात सायबर अपराध वाढले आहे. या काळात ऑनलाईन फसवणूक सर्रास केली जात आहे. कधी कश्या रूपाने तर कधी कश्या रूपाने भोळ्या भाबड्या माणसांची फसवणूक केली जात आहे. सध्याच्या काळात महत्वाच्या कागद्पत्राद्वारे देखील फसवणुकीचे प्रकार सुरु आहे. त्या मधील एक आहे आपल्याला दिले जाणारे बनावट आधारकार्ड. 
 
होय, आपले आधारकार्ड आणि ते देखील बनावट. विश्वासच बसत नाही न. पण सध्याच्या काळात आपल्या सर्वाना लागणारे हे महत्वाचे असे कागदपत्र मानले जाते. आज सर्व ठिकाणी आधारकार्डाला महत्व आहे. सर्व शासकीय किंवा खाजगी कामात आधार कार्ड क्रमांकाची गरज असते. पण एकाएकी असे लक्षात आले की आपल्याकडे असलेले आधारकार्ड खरे नसून बनावटी आहे, तर ते आपल्यासाठी मनस्ताप देणारे आणि त्रासदायक असू शकतं. अश्या या मनस्ताप आणि त्रासदायक समस्या आपल्या बरोबर होऊ नये त्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्या कडे असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट. ते कसं काय ओळखता येईल ? तर आम्ही आपणास सांगत आहोत त्याची माहिती.
 
आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वात आधी आधाराच्या या अधिकृत असलेल्या वेबसाईट किंवा संकेत स्थळावर जावे.   
https://resident.uidai.gov.in/aadhaarverification 
 
* इथे आपल्या समोर एका आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी पेज येईल, त्या पेजवर एका टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक द्यावयाचा आहे. 
 
* आपल्या समोर आधार कार्ड क्रमांक दिल्यावर एक captcha code दिसेल तो टाकायचा आहे.
 
* नंतर व्हेरीफाय विचारल्यावर त्या व्हेरीफाय वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या आधारकार्डाच्या क्रमांकाशी निगडित असलेले एक नवे पेज येईल. त्यावर एका मेसेज मध्ये आपल्याला आपलं आधारक्रमांक दिसेल.
 
* त्यावर इतर माहिती देखील दिलेली असणार. जर आपला आधार क्रमांक चुकीचा किंवा खोटा असेल तर तिथे "Invalid aadhar number "असा मेसेज दिसून येईल. 
 
सर्वात महत्वाचे असे की आपल्याला आपल्या आधाराशी निगडित ऑनलाईन माहिती मिळवायची असल्यास आपले मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं महत्वाचं आहे. आपण नोंदणीच्या वेळी दिला असलेला मोबाईल नंबर किंवा आपले ईमेल आयडी व्हेरिफेकेशन साठी देऊ शकता. आपण आपल्या आधाराशी निगडित काहीही तक्रारीं नोंदविण्यासाठी टोल फ्री नंबर 1947 ला फोन लावून संपर्क करू शकता.