1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (14:29 IST)

भाजपशिवाय सरकार आल्यास तो जनतेचा अपमान : सुभाष देशमुख

If the government comes without BJP
"राज्यातील जनतेनं भाजप शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला आहे. मात्र भाजपशिवाय इतर कोणत्याही पक्षाची सत्ता आल्यास जनतेनं दिलेल्या कौलाचा अपमान होईल," असं वक्तव्य माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.
 
"एखाद्या राज्यात मोठा पक्ष सोडून दुसरं सरकार स्थापन होत असेल, तर हे सरकार महाराष्ट्राच्या दृष्टीने सुरक्षित राहील की नाही, हे महाराष्ट्राच्या मनात शंका निर्माण होण्यासारखं आहे. कारण महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे", असंही ते म्हणाले आहेत.
 
सोलापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.