शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:48 IST)

बलात्काराच्या आरोपीला IPSने गोळ्या घातल्या

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये पोलीस अधीक्षक अजय पाल शर्मा यांनी हत्या आणि बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला पायावर गोळ्या झाडून पकडलं आहे. नाझील नावाच्या तरुणाने 6 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली, असा त्याच्यावर आरोप आहे.
 
7 मे रोजी या मुलीचे अपहरण झाल्याची नोंद झाली होती. या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यावर अजय पाल शर्मा यांनी आरोपीच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला पकडलं.
 
आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांवर गोळ्या झाडल्यावर गोळीनेच उत्तर मिळेल असं अजय पाल शर्मा यांनी म्हटलं आहे.