शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)

PMC घोटाळा: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला RBIचं सुप्रीम कोर्टात आव्हान

पंजाब महाराष्ट्र बँक (PMC) प्रकरणात HDILची संपत्ती विकण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.
 
5 जानेवारी 2020 रोजी मुंबई हायकोर्टानं HDILची संपत्ती विकण्यासाठी माजी न्या. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्त्वात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती.
 
HDIL कपंनीनं PMC बँकेचे बुडवलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले होते. PMC बँकेत 4,355 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर RBI नं बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळं हजारो खातेधारकांचे पैसे बँकेत अडकले.