शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (15:29 IST)

महाराष्ट्र मतदान दुसरा टप्पा : EVMमध्ये गैरप्रकार झाल्याचा आंबेडकरांचा आरोप प्रशासनाने आरोप फेटाळला

''महाराष्ट्रात जिथं मतदान सुरू आहे. त्यातील अनेक ठिकाणी मतदानयंत्रं नीट काम करत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन जिथे जिथे मतदान यंत्रात बिघाड झालाय, तिथे मतदानाची वेळ वाढवावी'' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
 
ईव्हीएमवर कोणतंही बटन दाबलं तरी ते मत भाजपलाच जात होतं. असं दोन मशीन्समध्ये झालं. हे मशीन सील करण्यात आलं आहे, असं आंबेडकरांनी सांगितलं.
 
किमान सोळा मशीन नीट काम करत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असं आंबेडकरांनी सांगितलं.
 
प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार झालेला नाही. अशी कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही. एका चिन्हावर बटण दाबल्यावर कमळाला मतदान जात होतं ही सर्वथा चुकीची बाब आहे. ही दिशाभूल करणारी बाब आहे. मी निवडणूक अधिकारी म्हणून स्वतः खात्री केली आहे पण त्यात असा प्रकार आढळून आला नाही, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकरांचं मतदान अकोल्यात आहे पण अद्याप ते सोलापूरमध्येच तळ ठोकून आहेत. त्यांनी अद्याप मतदान केलं नाही.
 
दरम्यान सोलापुरात पहिल्या दोन तासात 5 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.