testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हिंद आणि अटलांटिक महासागराचा संगम अर्थातच केपटाऊन

Capetown
Last Modified मंगळवार, 18 जून 2019 (13:36 IST)
दक्षिण आफ्रिकेतल्याच नव्हे, तर जगातल्या काही सुंदर शहरांपैकी एक शहर आहे केपटाऊन. हिंद महासागर आणि अटलांटिक महासागराच्या संगमाच्या ठिकाणी केपटाऊन बसले आहे. 'सुंदर' कशाला म्हणतात, हे तुम्हाला या शहरात आल्यानंतर कळेल.
शहराची सौंदर्य बघायला बाहेर पडायला लागत नाही. कुठेही बघितलं तरी जे काही दिसतं ते सुंदरच असतं. एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे केपटाऊनला जगप्रसिद्ध टेबल माऊंटनचा आधार लाभला आहे. थंड हवेमुळे केपटाऊन हिरवेगार आहे. 1500 मीटर उंचीवर असलेले टेबल माऊंटन जगातील सर्वात मोठे पठार आहे. पाचगणीच्या कमीतकमी 20 पट मोठे हे पठार आहे.
Capetown
टेबल माऊंटवर जायचा केबलकारचा प्रवास चित्तथरारक असतो. कारण वर जाताना केपटाऊन शहराच्या सौंदर्यात महासागरांचा संगम भर टाकतो. टेबल माऊंटनवरून नेल्सन मंडेलांना 17 वर्षे डांबून ठेवलेला रोबेन आलंडचा तुरुंग दिसतो. आता या तुरुंगात गेल्यावर मंडेलांसोबत तुरुंगवास भोगलेले क्रांतीवीर माहिती सांगतात.
केपटाऊन शहराचं मुख्य आकर्षण आहे 'वॉटरफ्रंट' नावाने ओळखला जाणारा भाग. अटलांटिक महासागराचे अफलातून दर्शन या जागेवरून होते. समुद्राचा अथांगपणा काय असतो हे वॉटरफ्रंटचा सूर्यास्त बघितल्यावर कळते. अथांग समुद्र, उंचच्या उंच पहाड, वाळवंट, सोन्याच्या आणि हिर्‍यांच्या खाणींबरोबबरच वन्य जीवनाचा आस्वाद इतिहासाच्या मोठा वारसा लाभलेला या अनोख्या देशात-दक्षिण आफ्रिकेत घेता येतो.
Capetown
एकच विनंती आहे - दक्षिण आफ्रिकेत आलात तर चार-पाच दिवसांसाठी येऊ नका. जरा मोकळा वेळ काढून या. तुम्हा पर्यटकांना मोह घालणारे सर्वकाही या देशात अनुभवायला मिळेल.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

Sacred games Season 2: सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन फसलाय का?

national news
लहानपणापासून अभ्यासात हुशार मुलगा. दहावीच्या वर्षात उत्तम गुणांनी पास होतो. त्याबद्दल ...

सुयोग झालाय सातारचा सलमान!

national news
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. ...

नेहाची 'तिकीट टू फिनाले' मध्ये झेप

national news
बिगबॉस मराठी सीजन २ च्या घरात १०० दिवसांचे कठोर आव्हान स्वीकारत 'तिकीट टू फिनाले' आपल्या ...

सारा अली खानने सांगितलं, सावत्र आई करीन आणि तिच्यात कसं ...

national news
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानने खूप कमी वयात फिल्म इंडस्ट्रीमध्ये ...

मिनिषा लांबाच्या या हॉट बिकिनी फोटोने वाढवले सोशल मीडियाचे ...

national news
बॉलीवूड एक्ट्रेस मिनिषा लांबा बर्‍याच वेळेपासून चित्रपट दृष्टीपासून दूर आहे, तरी देखील ती ...