1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (17:45 IST)

एबी डिव्हिलियर्सच्या मते दक्षिण आफ्रिका नव्हे तर या चार टीम्स आहे वर्ल्ड कपच्या दावेदार

world cup
ICC World Cup 2019 मध्ये आता जास्त वेळ राहिला नाही आहे. सर्व टीम्स दीर्घ काळापासून तयारी करत आहे. येथे सर्वात मोठा प्रश्न आहे की यावेळी वर्ल्ड चॅम्पियन कोण बनेल? दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या मते अशा चार टीम्स आहेत ज्या यावेळी वर्ल्ड चॅम्पियन बनू शकतात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या टीम्समध्ये आफ्रिकेचे नाव नाहीत. 
 
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत एबीडी म्हणाले, 'दक्षिण आफ्रिका टीम या स्पर्धेत सहभागी आहे, पण मी प्रामाणिकपणे बोललो तर ती वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मजबूत प्रतिस्पर्धी नाही.' एबीडीच्या मते भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या चार टीम्स पैकी एक या वेळी वर्ल्ड चॅम्पियन बनू शकते. ते म्हणाले, "भारत आणि इंग्लंड टीम मजबूत दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले पाच वर्ल्ड कप खिताब जिंकले आहे आणि पाकिस्तान दोन  वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला होता. हे चार टीम्स या स्पर्धेसाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी असल्याचे दिसते.' 
 
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम पाच एकदिवसीय सामन्यांच्या सिरीझमध्ये 4-0 ने पुढे आहे. एबी डिव्हिलियर्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणार आहे. एबीडीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.