1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (19:32 IST)

गिर वन्यजीव अभयारण्य गुजरात

भारताच्या जंगलात हत्तीची आवाज,मोराचा नाच,उंटाची सैर,सिंहाची गर्जना,कोट्यावधी पक्ष्यांची किलबिलाहट बघायला आणि ऐकायला मिळते. भारतात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. देश-विदेशातील पर्यटक वन्य प्राणी बघण्यासाठी येथे येतात.भारतात 70 हुन अधिक राष्ट्रीय उद्याने आणि 500 हुन अधिक वन्य प्राण्यांचे अभयारण्य आहे.या व्यतिरिक्त पक्षींचे अभयारण्य देखील आहे.चला या वेळी  गुजरातच्या गिर वन्यजीव अभयारण्याच्या बद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊ या.
 
गिर वन्यजीव अभयारण्य: गिर वन राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य गुजरात राज्यात आणि पश्चिम-मध्य भारत राज्यात आहे.1424 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या अभयारण्यात सिंह,सांबार,बिबट्या आणि रानडुक्कर प्रामुख्याने आढळतात.गिर वन राष्ट्रीय उद्यानात तुळशी-श्याम धबधब्याजवळ भगवान श्रीकृष्णाचे लहान मंदिर आहे.
 
जंगलाचा राजा सिंहाचे शेवटचे आश्रय स्थान म्हणून गिर वन भारतातील महत्त्वाच्या वन अभ्यारण्यापैकी एक आहे.गिरच्या अभयारण्याला 1965 साली वन्यजीव अभयारण्य बनविले आणि 6 वर्षा नंतर त्याचे विस्तार 140 .4 चौरस किलोमीटर करून राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित केले.

जुनागड शहरापासून 60 किलोमीटर दक्षिण -पश्चिम मध्ये कोरड्या झुडुपांच्या पर्वतीय क्षेत्रात या उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे 1,295 चौरस किलोमीटर आहे.गीर अभयारण्य श्रेणीत थंड ,उष्ण आणि उष्णदेशीय पावसाळी हंगाम आहेत . उन्हाळ्याच्या काळात इथली हवामान खूप गरम असते.कोरड्या खजुरीची झाडे, काटेरी झुडुपे, भरभराट हिरव्यागार झाडाखेरीज समृद्ध गीर जंगल नदीच्या काठावर वसलेले आहे. इथली मुख्य झाडे सागवान, रोझवुड, बाभूळ, मनुका, जामुन, बील इ.प्रसिद्ध आहे.या जंगलात मगरींसाठी शेती विकसित केली जात आहे. गुजरात सरकारने परप्रांतीयांसाठी आंबर्डी पार्कही बनवले आहे.