मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (12:03 IST)

आमिर खानची मुलगी इराने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचे दिले स्पष्टीकरण, याला डेट करत आहे

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची मुलगी इरा खान त्या स्टार किड्सपैकी एक आहे जी लाईम लाइटपासून फार दूर राहते. ती फारच कमी वेळा आमिरसोबत कुठल्याही बॉलीवूड इवेंटमध्ये दिसून येते. पण इरा नेहमी आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहते.  
 
नुकतेच सोशल मीडियावर इराचे बरेच फोटो वायरल होऊ लागले आहे ज्यात ती एका मेल फ्रेंडसोबत दिसत आहे. याला बघून तिचे चाहते सवाल करू लागले की इरा त्याला डेट तर नाही करत आहे? नुकतेच ऐका चाहत्याने इंस्टाग्रामवर इराला प्रश्न केला की काय ती रिलेशनशिपमध्ये आहे  ?
 
इरा खानने आपल्या रिलेशनशिप स्टेट्सचा खुलासा केला आहे. या फोटोत ती तिच्या मित्राला हग करताना दिसत आहे. या व्यक्तीचे नाव आहे मिशाल कृपलानी. इराने आपल्या या पोस्टामध्ये ही गोष्ट कन्फर्म केली आहे की ती मिशालला डेट करत आहे. 
मिशाल एक आर्टिस्ट आहे ज्याने म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. इरा आणि मिशालने आपल्या इंस्टाग्रामवर एक दुसर्‍यांसोबत बरेच फोटो शेअर केले आहे ज्यात दोघांची बॉन्डिंग स्पष्ट दिसून येत आहे.