अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी

shabana urvarshi
Last Modified बुधवार, 22 जानेवारी 2020 (16:10 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी बॉलिवूडसह फॅन्सनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केलं आहे. उर्वशी म्हणाली, 'शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणारा आहे. त्या लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते' हे ट्विट तिने इंग्रजीमधून केलं होतं.
मात्र उर्वशीने केलेल ट्विटमुळे नेटकरंनी तिला तुफान ट्रोल केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की हे तो Ctrl C Ctrl V म्हणजेच कॉपी पेस्ट आहे असं नेटकर्‍यांच म्हणणं आहे. Ctrl C Ctrl V ही संगणकाची सांकेतिक भाषा आहे. याचा अर्थ कॉपी-पेस्ट करणं असा होतो. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या बर्‍या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे.
'शबाना यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बर्‍या होणसाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्विट मोदी यांनी केलं होतं. उर्वशीने केलेलं ट्विट हे कॉपी केल्याचं नेटकर्‍यांच म्हणणं आहे. उर्वशी आणि मोदी यांच्या ट्विटमध्ये साम्य आढळल्यानं नेटकर्‍यांनी ट्रोल केलं. उर्वशीने पंतप्रधान यांचं ट्विट कॉपी करून ट्विट केल्याचा आरोप होत आहे. 'उर्वशी कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्वतःचं लिही की', अशा पद्धतीच्या कमेंट्‌स करून आणि मीम्स तयार करून उर्वशीला ट्रोल करण्यात आलं आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

काही मजेशीर म्हणी

काही मजेशीर म्हणी
वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा ! राहायला नाही घर म्हणे लग्न कर ! काटकसर ...

माझा चष्मा कुठे आहे ?

माझा चष्मा कुठे आहे ?
वकील: हत्येच्या रात्री तुमच्या पतीच्या अंतिम शब्द? पत्नी: माझा चष्मा कुठे आहे ...

‘मिस्टर लेले''मध्ये वरुणच्या जागेवर विकी

‘मिस्टर लेले''मध्ये वरुणच्या जागेवर विकी
शशांक खेतान दिग्दर्शन करणार असलेल ‘मिस्टर लेले' या आगामी सिनेमात वरुण धवन लीड रोल करणार ...

फिटंमफाट

फिटंमफाट
आपण स्वतःहुन 'फिट' राहिलो नाही तर.... . . .. कपड़े स्वतःहुन 'फिट' ...

प्रिया पहिल्यांदाच दिसणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

प्रिया पहिल्यांदाच दिसणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात
अनेक कलाकारांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली. या वर्षात अभिनेत्री प्रिया बापट हिच्या ...