शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)

शाहरुखच्या ट्विटला अजय देवगणने 'असे' प्रत्युत्तर

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगाची चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ साठी बॉलिवूडमधील सर्व कलाकारांनी अजयवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने देखील अजला जुने वाद विसरुन ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.  
 
जय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शाहरुखने छान असे कॅप्शन दिले होते. ‘माझा मित्र अजय देवगणच्या १००व्या आणि आगामी चित्रपटाची मला उत्सुकता आहे. या १०० व्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा… तु चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठा प्रवास केला आहेस. तान्हाजी चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले होते.
 
आता शाहरुखच्या या ट्विटला अजय देवगणने प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझा १०० वा चित्रपट तान्हाजी आणखी खास बनवण्यासाठी तुझे आभार!’ असे अजयने ट्विटमध्ये लिहिले होते.