बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (09:21 IST)

प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने केली आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने बुधवारी सकाळी घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने सुसाईट नोट लिहिली. यात त्याने त्याचे  बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केलं असल्याचं लिहीलं आहे.  अभिजीत शिंदेने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. 
 
सदरची घटना फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सगळा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तात्काळ  रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्या तीन महिन्यापासून माहेरी गेल्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजीतला 3 महिन्याची मुलगी आहे. मात्र, मुलीला भेटण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला सक्त नकार दिला. त्यामुळे तो खूप नैराश्यात होता.