अखेर गायीला का घाबरत आहे धर्मेंद्र?

dharmendra
बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे करून लोकांचे मनोरंजन करणारे स्मार्ट आणि सुपरस्टार धर्मेंद्र हल्ली आपला वेळ आपल्या फार्म हाऊसमध्ये घालवत असतात. त्यांना हल्ली निसर्गाच्या जवळ राहणे अत्यंत आवडतं. तसेच इतर कलाकरांप्रमाणेच ते देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे.

धर्मेंद्र अनेकदा फार्म हाउसचे फोटो शेअर करत असतात. कधी ट्रॅक्टर चालवताना तर कधी तेथील गायी-ढोरांचे फोटो पोस्ट करत असतात. हल्ली धर्मेंद्रने असे काही लिहित एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामुळे तो लगेच व्हायरल होऊ लागला.

या व्हिडिओत एक गाय आपल्याला बछड्यासह दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत धर्मेंद्र यांनी लिहिले की माझी गाय मला आपल्या नवजात बछड्याजवळ येऊ देत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक आई आपल्या नवजातसाठी संरक्षणात्मक असते. माझ्या सर्व मित्रांना खूप प्रेम... या पोस्टसह धर्मेंद्र यांनी हार्ट इमोजी टाकली.
धर्मेंद्र यांच्या या पोस्टावर यूजर्सचे कमेंट येऊ लागले. धर्मेंद्र आपल्या फार्म हाउसचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच धर्मेंद्र आपल्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसत होते. यापूर्वी धर्मेंद्र आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपटात दिसत होते. हा सिनेमा 2018 साली रिलीज झाला होता. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल आणि बॉबी देओल देखील होते.
अलीकडेच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी मिठाईचा डबा घेऊन एका हॉस्पिटल बाहेर दिसले होते. कारण त्यांच्या मुली एशा देओलने 10 जून रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. दुसर्‍यांदा आजी-आजोबा झाल्याच्या आनंदात ते लगेच मुलीला भेटायला गेले होते. त्यांच्या सोबत असलेल्या माणसाकडे मिठाईच्या डब्याची पिशवी दिसत होती.

एशाचे ही दुसरी मुलगी आहे जिचं नाव मिराया असून पहिल्या मुलीचं नाव राध्या आहे. बहुतेक आता स्वत:ची मुलगी आता केयरिंग आई झालेली बघून गायीला बघून संरक्षणात्मक आईची आठवण झाली असावी. तसेच धर्मेंद्र यांचं लहानपण गावात व्यतीत झालं असल्यामुळे आता त्यांना पुन्हा गावाची ओढ असल्याचे कळून येतं.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमागृहात रिलीज होणार

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमागृहात रिलीज होणार
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब'बाबत दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ ...

तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला ...

तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना
तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून एक महत्त्वाची ...

काय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे

काय सांगता, सुबोध भावे चक्क ऑनलाईन लग्न लावत आहे
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि येथे केवळ त्यांची जुळवणी केली जाते असे आपणही ...

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं

यामुळे साराने मोडलं सुशांतसोबतचं नातं
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा ...

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट ...