मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (18:14 IST)

सैन्य जवानांच्या समर्थनासाठी दिलजीत दोसांझने उचलले मोठा पाऊल

diljeet dosanjh
14 फेब्रुवारी रोजी पुलवामावर दहशतवादी हल्ला झाल्यापासून दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव चालू आहे आणि या दरम्यान गायक-अभिनेता दिलजीत दोसांझने भारतीय सैनिकांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. 
 
खरं तर गुरुवारी दिल्लीत मॅडम तुसादच्या संग्रहालयात दिलजीतचा वॅक्स स्टॅचू लॉन्च व्हायचा होता, पण या कार्यक्रमाला दिलजीतने रद्द केलं आहे. दिलजीतने ही माहिती ट्विट केली आहे. दिलजीतने लिहिले, देशाचे संरक्षणासाठी आमचे जवान कठोर संघर्ष करत आहे. देशात तणाव पाहूताना वॅक्स स्टॅच्यू लॉन्चला री-शेड्यूल केले गेले आहे. पुढच्या तारखेची घोषणा लवकरच होईल.