बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:16 IST)

दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानचा दावा खोटा

भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. याचे उत्तर देताना पाकचे एक विमान पाडण्यात भारताला यश आले. दरम्यान भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे. दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे असून आमचे पायलट सुरक्षित असल्याचे भारतीय लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
भारतीय वायुदलाच्या एका जवानाला अटक केल्याचंही पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले. पाकिस्तानी मीडियामध्येही हे वृत्त सतत दाखवले जात आहे. सकाळी भारतीय वायुदलाकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्यात आल्याचं गफूर यांनी सांगितले. याच ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या हवाईदलाकडून भारतीय वायुदलाच्या विमानांवर हल्ला केल्याचेही सांगितले. भारताच्या दोन विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत निशाणा करत त्यातील एक विमान खाली पडच्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि दुसरे भारतीय हद्दीतील काश्मीरध्ये पडल्याचे सांगत पाकिस्तानच्या हद्दीत एका भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा दावा पाकतर्फे करण्यात आला होता. हा दावा खोटा असल्याचे भारतीय लष्करातर्फे म्हटले आहे.