सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (13:46 IST)

बायोपिकसाठी गांगुलीचा सल्ला

‘माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली तर त्यात माझी भूमिका अभिनेता हृत्विक रोशननेच साकारावी', अशी इच्छा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलताना गांगुलीने हृत्विकला एक सल्ला दिला आहे. माझी भूमिका करण्यासाठी हृत्विकला माझ्यासारखी साधी शरीरष्टी करावी लागेल.
 
अनेकांना हृत्विकसारखी शरीरयष्टी करायची असते. मात्र माझी भूमिका करण्यासाठी त्याला माझ्यासारखी शरीरयष्टी करावी लागेल, असे गांगुलीने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात बायोपिक बनवण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंवरील बायोपिक विशेष प्रसिद्धी मिळवत आहेत. हृत्विक रोशन रोमँटिक, विनोदी, अॅडक्शन अशा कोणतही भूमिका तडफदारपणे साकारतो.
 
त्यामुळे जगभरात हृत्विकचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सौरव गांगुली सुद्धा हृत्विकचा  मोठा फॅन आहे.