शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (12:53 IST)

Expert Advice: चेस्ट एक्स रे आणि स्वॅब चाचणी पैकी काय सर्वात योग्य

जगात कोरोना ने सर्वत्र उच्छाद मांडले आहेत. कोरोना कमी होण्याचे नावच घेत नाही. कोरोनाला घेऊन सर्वत्र भीती व्याप्त आहे. आणि काही लोकं सामान्य झालेल्या सर्दी खोकला देखील कोरोनाशी जोडत आहे. त्याच बरोबर कोरोनाच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावामध्ये बऱ्याच लोकांचा मनात हा प्रश्न उद्भवत आहे की आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये या संसर्गाची ओळख कशी होऊ शकते आणि या साठी ची कोणती चाचणी सर्वात योग्य आहे? तर या साठी तज्ज्ञ सांगतात की चेस्ट एक्सरे आणि स्वॅब चाचणी मध्ये कोणती योग्य आहे ?
 
कोरोनाच्या चाचणीसाठी चेस्ट एक्सरे आणि स्वॅब चाचणी मध्ये काय सर्वात योग्य आहे चला जाणून घ्या.
तज्ज्ञ सांगतात की स्वॅब चाचणीमध्ये लॅब मध्ये एक कॉटन स्वॅबने घशात किंवा नाकाच्या आतून नमुना घेतला जातो. तज्ज्ञ सांगतात की कोरोनासाठीच्या 2 चाचण्या असतात. पहिले आहे नेजल स्वॅब (नाकातून चाचणी) आणि दुसरे आहे थ्रोट स्वाब(घशातून चाचणी). 
 
नेजल स्वॅब- नेजल स्वॅबमध्ये ज्या लोकांना सर्दी असते, त्यांची चाचणी नेजल स्वॅबच्या मदतीने केली जाते. आणि ज्यांना खोकला असतो त्यांचा साठी थ्रोट स्वॅब मधून त्याची चाचणी केली जाते. 
 
जेव्हा या चाचण्या केल्या जातात तेव्हा हे नमुने लॅबोरेटरीमध्ये पाठविले जातात. त्यानंतरच आपल्याला योग्य निकाल मिळतो.
 
तज्ज्ञ सांगतात की कोरोनाच्या चाचणीसाठी स्वॅब टेस्ट ही सर्वोत्कृष्ट चाचणी मानली जाते, कारण ही 100 % पुष्टीकरणासह निकाल देतात. म्हणून एक्सरे चाचणी पेक्षा स्वॅब टेस्ट घेणे चांगले असते, कारण छातीचा एक्सरे केल्याने असे दिसून येते की कुठेतरी त्या व्यक्तीला श्वास घ्यायला काही त्रास तर होतं नाही. पण स्वॅबच्या चाचणीतून घशात किंवा नाकाच्या आतून नमुना घेऊन चाचणी घेतली जाते, जेणे करून कोरोनाची पुष्टी होऊ शकेल.