testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Girish Karnad: फिल्म अभिनेता गिरीश कर्नाड यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन

बंगळुरू| Last Modified सोमवार, 10 जून 2019 (10:28 IST)
ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे आज, प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी बंगळूर येथील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. आई कृष्णाबाई ऊर्फ कुट्टाक्का-बालविधवा असलेल्या त्यांनी डॉ. कर्नाडांशी विवाह केल्यानंतर सामाजिक टीका झाली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. प्रतिष्ठित ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत 1963मध्ये त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्येच काही काळ काम केल्यानंतर ते मद्रास येथील कचेरीत कार्यरत झाले.
पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित गिरीश कर्नाड यांनी बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. लेखनासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

जलपरी सनी लिओनी, शेअर केले हॉट फोटो

national news
बॉलीवूड हॉट एक्ट्रेस सनी लिओनी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते आणि ...

नयनरम्य पाचूचे बेट

national news
भारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. ...

स्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये ...

national news
प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी ...

आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता ...

national news
सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ...

मिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ ?

national news
भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा “मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच ...