सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया या मालिकेत इमरती देवी ही भूमिका करत होत्या. या मालिकेमुळे त्या घराघरात फेमस झाल्या होत्या. त्या ६२ वर्षांच्या होत्या. 
 
त्या गेला काही काळ त्या किडनीविकाराने त्रस्त होत्या. किडनी विकारामुळे त्यांना दर एक दिवसाआड डायलिसिससाठी जावं लागत होतं. पण तब्येत खराब असल्यामुळे मागील दहा दिवसांपासून त्यां सुजय रुग्णालयात भरती होत्या.
 
कलाकार शिशिर शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची बातमी कळवली. त्या मोठ्या पडद्यावरही त्या कार्यरत होत्या. त्यांनी आजवर 70 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. राज, ज्युली, अनुरोध, फूलन देवी, घर हो ऐसा, बेटा, लव, रंग, दलाल, तम्मना, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं सारखे काही चित्रपट सामील आहेत. तर छोट्या पडद्यावर कुमकुम, छोटी बहू, हसरतें, साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी अशा प्रसिद्ध मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.