शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (15:12 IST)

आयफा २०१८ चा पुरस्कार सोहळा संपन्न

यंदाचा आयफा २०१८ चा पुरस्कार सोहळा बँककॉकमध्ये पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान खान याला हिंदी मीडियमसाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आल. आयफा २०१८च्या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकार व प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. तसंच बॉलिवूडच्या कलाकारांनी या ग्रीन कार्पेटच्या मंचावर नृत्याच्या माध्यमातून तेथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.तसंच या सोहळ्यात अजूनही तरुणीची झलक दाखविणाऱ्या रेखाजींनी तब्बल २० वर्षानंतर आपल्या नृत्याच्या अदाकाराने सर्वांना मोहून टाकलं. 
 
‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आयफाचा मान पटकवला आहे. तसंच दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आयफाच्या डॉलचं मान्हचिन्हानं देण्यात आलं आहे. श्रीदेवींच्या मानचिन्हानाचा स्विकार बोनी कपुर यांनी केला आहे. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून इरफान खान याला हिंदी मीडियमसाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.दोन दिग्गज कलाकारांसोबत बेस्ट सपोर्टिंग कलाकार म्हणून मेजर हिज व नवाजुद्दिन सिद्दिकीला प्रदान करण्यात आला.