testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इरफानचा गुपचूप भारत दौरा

Last Modified बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (00:03 IST)
अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन हा दुर्धर आजार असून लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो तिथेच असून दिवाळीच्या निमित्ताने इरफान काही दिवस भारतात आला होता. सध्या त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा असून तो लवकरच शूटिंगलाही सुरुवात करणार असल्याचं समजतंय. पण त्यादरम्यान, इरफानने दोन दिवसांसाठी भारतात येऊन नाशिकमधल्या त्र्यंबकेश्र्वरचे दर्शन घेतल्याचं कळतंय. इरफानने या दौर्‍याची कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्र्वरचं दर्शन घेऊन इरफानने तिथे हवन आणि पूजासुद्धा केली. इरफानने त्याच्या आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी ही पूजा केल्याचं समजतंय. त्यानंतर लगेचच तो लंडनला रवाना झाला. इरफान 'हिंदी मीडियम' या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण शूटिंगसाठी पूर्ण वेळ देण्याला डॉक्टरांकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत तो पहिल्यासारखं नियमित काम करू शकणार असल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी
'हिंदी मीडियम'चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्यानेसिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. 2017 साली प्रदर्शित झालेला इरफानचा 'हिंदी मीडियम' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफानसोबत झळकली होती.यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

जेव्हा सनी लिओनीने अर्नबला विचारले ’मी किती मतांनी आघाडीवर ...

national news
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर सगळ्या चॅनल्सवर सतत निकालाचा अंदाज देण्यात येत ...

अभिनेता वरूण धवनचे शुभमंगल

national news
आता अभिनेता वरूण धवल बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा ...

बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते ...

national news
आज सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना तिचा 19वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

म्हणून परिणिती करणार ट्रेनमधून प्रवास

national news
परिणिती चोप्रा 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या ...

रिंकूच्या नव्या चित्रपटाचा टीजर लॉन्च

national news
सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर ...