testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘जुडवा-2’ हिट

Last Modified सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:31 IST)
अभिनेता वरुण धवनच्या ‘जुडवा-2’ चित्रपटाने तीन दिवसांच्या कमाईमध्ये यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.
प्रदर्शनानंतर तीन दिवसांत 59 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा चित्रपट 3500 थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या कमाईची माहिती दिली आहे. “पहिल्या दिवशी सिनेमाने 16.10 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसात एकूण 59.25 कोटींची कमाई केली आहे,”असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलं आहे. यासोबतच विश्लेषकांनी हा सिनेमा सुपरहिट असल्याचं जाहीर केलं आहे.

‘जुडवा-2’ हा 1997 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’चा रिमेक आहे. हा चित्रपट वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शिक केला होता. चित्रपटात वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.यावर अधिक वाचा :