testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कादर खान यांचे वय झाले, बोलतांना होतो त्रास

Last Modified शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (15:15 IST)

काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान आता आजारपणामुळे खंगले आहे.

त्यांना बोलतानाही त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. कादर खान यांच्या सुनेने यासंबंधीची माहिती एका वेबसाइटला दिली. त्यांच्या सूनबाई शाहिस्ता खान म्हणाल्या,‘त्यांना बोलताना खूपच त्रास होत आहे. ते काय बोलतात हे फक्त मी आणि माझे पतीच समजू शकतो. बोलण्यात अडथळा येत असला तरीही त्यांची स्मृती चांगली असून, ते सर्वांना ओळखत आहेत.’ त्यांच्या प्रकृतीविषयी फार काळजी करण्याची गरज नाही. कारण, वय वाढल्यामुळेच त्यांना हा त्रास होत असल्याचेही शाहिस्ता यांनी सांगितले. आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, ते माझ्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगत आहेत, असे त्यांचा मुलगा सरफराज यांनी सांगितले आहे.यावर अधिक वाचा :