मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कंगना करणार 'राजकारण' लवकरच निवडणूक

kangana ranawat
बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना राणावतने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकदा भेटही घेतली आहे. कंगनाच्या समजूतदारपणावर आणि अभिनयाने पंतप्रधान प्रभावित असल्याचेही बोलले जात आहे.  सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार कंगना राणावत हिमाचल प्रदेशातून राजकारणात उतरू शकते. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथील राहणारी आहे. ती याच क्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते. त्यामुळे आता कंगना ही चित्रपट आणि राजकारण या दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. त्यामुळे आता रेखा. जया बच्चन यांसारखे काम करण्याची संधी तिला मिळणार आहेत.