testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कतरिना कैफ बाई आरती करताना असे ओवाळतात का ? झाली कतरिना ट्रोल

नेटकरी कधी कोणाला डोक्यावर घेतील, कधी कोणाला खाली पडतील याचा काही अंदाज नाही. आता हाच फटका कतरिना कैफ या अभिनेत्रीला बसला आहे. तेही गणपती आरती
करते वेळी चुकीच्या दिशेने पूजा करताना ओवाळताना दिसली, मग काय, नेटकरी झाले सुरु. ढोल ताशांच्या गजरात, गणरायाचे सर्वत्र आगमन झाले. त्याबरोबर बॉलिवूड दबंग सलमान खान याची लहान बहीण अर्पिता खान हिच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले होते.

यावेळी सलमानची बहिण म्हणून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अर्पिताच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अर्पिताचे कुटुंबीय आणि काही खास मित्र मैत्रिणी गणरायाची आरती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओवरून अभिनेत्री कतरिना कैफ हिला नेटकऱ्यांनी जोरदार सुनावले आहे. कतरिना ही गणरायाची आरती करताना गणरायाला जगावेगळ्या पद्धतीने ओळताना समोर आली आहे. सलमानची मोठी बहिण अलविरा खान हिचा नवरा व अभिनेता अतुल अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर सहज हा व्हिडीओ शेअर केला होता. नेहमीच आरती ओवाळताना डावीकडून उजवीकडे ओवाळली जाते असे आहेच, मात्र या व्हिडीओत कतरिना आरती ओवाळताना उजवीकडून डावीकडे ओवाळताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिला अनेकांनी सुनावले आहे की आरती आणि पूजा तरी ठावूक आहे का ? जमत नसेल तर असे करू नये, तू कधी कोणाला ओवाळले आहे का ?


यावर अधिक वाचा :

सलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज

national news
अभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...

कलाकारांच्या यशावर ठरते मानधन

national news
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...

प्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो

national news
बॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...

मुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित

national news
शाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...

दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...

national news
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...