testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही : सुप्रीम कोर्ट

पद्मावती सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सेन्सॉर बोर्डाने अजून सिनेमाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेताच गाणं रिलीज केलं. गाण्यात एका सन्मानित राणीला नृत्यांगना दाखवण्यात आलं, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. मात्र ट्रेलर रिलीज करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती, असं निर्मात्यांनी सांगितलं.

दरम्यान पद्मावती सिनेमावरुन दिग्दर्शक संजय लिला भन्साळींना धमक्या दिल्या जात आहेत. करणी सेनेने पद्मावतीला समर्थन देणाऱ्या आणि पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचं नाक कापण्याचीही धमकी दिली होती. तसंच तर काही संघटनांनी प्रेक्षकांना सिनेमाचं तिकीट काढण्यापूर्वी विमा काढून ठेवण्याचीही धमकी दिली होती.


यावर अधिक वाचा :