testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रणवीरने थकवला ड्रायव्हरचा पगार

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटला सुरूवातीपासूनच अनेक अडचणींना सामना करावा लागला. पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवर नवा वाद पाहायला मिळाला.
स्पॉटबॉय या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेता रणवीर सिंगचा ड्रायव्हर आणि यांच्या कडाक्याचं भांडर झालं असून त्यांच्या या भांडणामुळे चित्रीकरणसुद्धा थांबवण्यात आलं होतं. अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचं फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरू असतानाच अचानक बाहेरून येणार्‍या हाणामारीच्या आवाजामुळे त्यात व्यत्यय येत होता. त्यावेळी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनीसुद्धा रणवीरच्या ड्रायव्हर आणि बॉडगार्डला शांत राहण्याची ताकीद दिली.
भन्साळी यांनाच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर यावं लागलं. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा रणवीरचा ड्रायव्हर सूरज पाल आणि बॉडीगार्ड विनायक यांच्यात झालेला वाद त्यांच्यासमोर आला. रणवीरच्या ड्रायव्हरला दोन महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता त्यामुळे त्याने मॅनेजरकडे थकलेल्या पगाराची मागणी केली पण मॅनेजरने त्यांचं म्हणणं ऐकून न घेता बॉडीगार्डला सांगून त्या ड्रायव्हरला बाजूला नेण्यास सांगितलं. बॉडीगार्डने त्यानंतर ड्रायव्हरला मारण्यास सुरूवात केली. त्यावेळी मॅनेजरने मध्ये पडत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. यानंतर रणवीरने ड्रायव्हरला कामावरून काढून टाकले.


यावर अधिक वाचा :

देवदत्त नागे सत्यमेव जयते मध्ये खलनायक साकारणार

national news
जय मल्हार या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये ...

मित्राचा फुकटचा सल्ला

national news
रमेश... मानसोपचार तज्ज्ञाकडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला ...

सैफ अली खान बनणार नागा साधू

national news
सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या ...

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...