गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'पद्मावती' आता पद्मावतच्या नावाने रिलीज होईल, CBFCचा हिरवा कंदील

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मोस्ट अ वेटेड सिनेमा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’लवकरच रिलीज होणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखविला आहे. सूत्रानुसार या चित्रपटाचे शिर्षक आणि घुमर या गाण्यात काही बदल केल्यानंतर हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. पद्मावती चित्रपटावरील वाद पाहता सेन्सॉर बोर्डाने काही इतिहासकारांना आणि पद्मावतीच्या घराण्यातील वंशजाना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले होते व चार सदस्यीय कमिटी बनविण्यात आली असून त्यांनी सांगितले आहे की 'पद्मावती' पद्मावतच्या नावाने रिलीज झाले तर काहीच हरकत नाही. 
 
यामध्ये प्रो. बी. एल. गुप्ता, प्रो. आर. एस. खांगराट, उदयपुरचे अरविन्द सिंह मेवाड़, डॉ. चंद्रमणि सिंह यांचा समावेश होता. २८ डिसेंबर रोजी सेन्सॉर बोर्डाची बैठक झाली असून यावेळी चित्रपट प्रदर्शनाचा निर्णय घेण्यात आला. याआधी या कमिटीने पद्मावती चित्रपटाच्या कथेवरच आक्षेप घेतला होता. मात्र या चित्रपटाचे शिर्षक आणि घुमर या गाण्यात काही बदल केल्यावरच हा चित्रपट प्रदर्शित करावा असा निर्णय घेण्यात आला. तसेच चित्रपटाला यु.ए.(U.A.) सर्टिफिकेट दिले जाणार असून निर्मात्यांना चित्रपटात डिस्क्लेमर दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
दरम्यान सेन्सॉर बोर्डाने म्हंटले आहे कि, समाज आणि निर्मात्यांना विचारात घेऊन संतुलित दृष्टीकोनाने या चित्रपटास मान्यता देण्यात आली आहे. आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.