शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल

बॉलिवूडमधील कसदार अभिनेता अशी ओळख असलेले परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. नरेंद्र मोदींवरील बायोपिकची सध्या जोरदार तयारी सुरू असून यात रावल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
 
मोदींवरील चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असे नमूद करताना पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्क असेल, असे रावल यांनी सांगितले. मोदींवरील बायोपिकची निर्मिती रावलच करत आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
 
दरम्यान, संजय दत्तचा बायोपिक असलेल्या 'संजू' चित्रपटात रावल यांनी सुनील दत्तची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.