1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (07:02 IST)

पूजा भट्टला कंगनाचे सडेतोड उत्तर

Pooja Bhatta
घराणेशाहीच्या मुद्यावरून आता पूजा भट्ट आणि कंगना रणौत यांच्यामध्ये टि्वटरवॉर रंगले. कंगनाला भट्ट कुटुंबीयांनीच लाँच केले असे म्हणणार्याट पूजाला आता कंगनाने उत्तर दिले आहे. ‘कंगनाची प्रतिभा अनुराग बासू यांनी ओळखली आणि प्रत्येकाला हे माहीत आहे की मुकेश भट्ट यांना कलाकारांना पैसे द्यायला आवडत नाही. प्रतिभावान कलाकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे उपकार अनेक स्टुडिओ त्यांच्यावर करतात. त्यामुळे तिचा अपपान करण्याचा अधिकार तुझ्या वडिलांकडे नाही', असे टि्वट कंगनाच्या टीमने केले आहे. त्यांनी सुशांत आणि रिया यांच्या नात्यात इतके लक्ष का दिले? त्यांनी त्याच्याही शेवटावर का वक्तव्य केले यांसारखे काही प्रश्न तू त्यांना जाऊन विचार.
 
कंगनाने गँगस्टरसोबतच पोकिरी या चित्रपटासाठीही ऑडिशन दिले होते आणि त्यासाठीही तिची निवड झाली होती. पोकिरीसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता आणि तुला वाटते की ती आज जे काही आहे ते गँगस्टर चित्रपटामुळे आहे. पाण्याचा प्रवाह कोणीच रोखू शकत नाही', असे पूजाला सुनावले.