बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 21 मे 2018 (12:21 IST)

प्रभासचा करणला पुन्हा नकार

'बाहुबली-2'च्या यशानंतर प्रभासची लोकप्रियता वाढली असून त्याचे जगभरात चाहते आहेत. 'बाहुबली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवित अनेक विक्रम स्थापित केले, जे अनेक सुपरस्टार अभिनेत्यांना पार करणे अशक्य आहे. 
 



बाहुबलीसाठी प्रभासने 25 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. तर चित्रपटाच्या अपार यशस्वीतेनंतर त्याने 30 कोटी रुपये मानधन घेण्यास सुरूवात केली. प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी मोठ-मोठे निर्माता प्रयत्नात असून यात करण जोहरचे नाव सर्वात प्रथम येते. मात्र, प्रभासने दुसर्‍यांदा करण जोहरची ऑफर नाकारली आहे. प्रभास सध्या साहो चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अबुधाबी येथे व्यस्त आहे. त्यातच करण जोहरने त्याला चित्रपटासाठी ऑफर दिली. मात्र, प्रभासने वेळ नसल्याचे कारण देत नकार दिला. दरम्यान, ही नकार देण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही करण जोहरने ऑफर दिली होती तेव्हा प्रभासने भारी भरकम फीची मागणी केली होती. प्रभासने तब्बल 20 कोटी रुपयांचे मानधन मागितल्याने करण जोहरने माघार घेतली होती.