कपड्यांवरून रणवीर पुन्हा ट्रोल
अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. नुकताच रणवीरचा एक फोटो सोशल मीडिावर व्हारल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याला ट्रोल करण्यात आले.
नुकताच रणवीरने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा ठिपक्यांचा शर्ट परिधान केला आहे. त्यावर रंगीबेरंगी पट्यांची पॅन्ट परिधान केली आहे. रणवीरचा हा लूक जुन्या काळातील एका अभिनेत्रीच्या कपड्यांप्रमाणे वाटत असल्याने नेटकरंनी त्याला ट्रोल केले आहे. एका नेटकरने तर पुन्हा दीपिकाचे कपडे परिधान केलेस का? असा प्रश्र्न दीपिकाला विचारला आहे. तर काही नेटकर्यांनी त्याच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. लवकरच रणवीरचा '83' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील लॉर्डस्च्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित '83' हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सली, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.